कारने डिव्हायडरला जोराची धडक दिल्याने एक ठार तर एक जखमी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पुणे - कोल्हापूर हायवे रोडवर पंचगंगा पुलावरील असलेल्या डिव्हायडरला फोर्च्युन  कारने जोराची धडक दिल्याने कार चालक बाळकृष्ण शंकर पवार (वय 38.रा.शाहुनगर रिंगरोड ,उरण -इस्लामपूर ) यांचा  मृत्यु झाला.तर अंकुश भगवान पाटील (वय 39) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत .हा प्रकार रविवार (दि.01)  रोजी रात्री दीडच्या सुमारास घडला आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत बाळकृष्ण पवार हे आपल्या मित्रासमवेत फोर्च्युन कारने रविवार (दि.01) रोजी रात्रीच्या  सुमारास इस्लामपूर येथून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पंचगंगा पुला जवळ असलेल्या डिव्हायडरला कारची जोराची धडक बसल्याने हे दोघे जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बाळकृष्ण पवार यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांच्या पश्च्यात आई-वडील,पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post