प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन या शाळेतील इयत्ता सहावीचे ३० विदयार्थी उत्तीर्ण झाले तर खालील ५ विदयार्थी गुणवत्ता यादीत आले.
१ ) दीप्ती शिवाजी घोरपडे
२) आरोही प्रकाश बूचडे
३) स्वरूपा रमेश मुतालिक
४) चेतना राहुल वडे
५) मेहेक सलीम तेरदाळे
या पाच विद्यार्थिनींनी होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवली आहे. यानिमित्त या विद्यार्थ्यांचि सत्कार इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते व उपायुक्त स्मृती पाटील आणि प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची माहिती दिली.आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या मनोगतात या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल व मुले चिकित्सक पणे अभ्यास करतील अशी आशा व्यक्त केली. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी मानले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके,निलोफर शेख,श्रीकांत सोलगे,संजय देमाण्णा,किरण दिवटे यांचे मार्गदर्शन लाभले.