प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी - अंतर्गत वादातुन चार पाच जणांनी गुप्ती आणि चाकूने हल्ला करून महाविद्यालयीन तरुण प्रसाद संजय डिंगणे (वय 17.रा.जवाहरनगर ) याचा भोसकून खून करून त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील (वय 22.रा.जवाहरनगर) याला गंभीर जखमी केले.हा प्रकार गुरुवार (दि.26)रोजी रात्री नऊच्या सुमारास कबनूर हायस्कूल एरियात घडला.या घटनेमळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतले.
यातील मयत प्रसाद कबनूर हायस्कूल मध्ये स्नेहसंमेलन बघण्यासाठी गेला होता.त्या वेळी चार पाच जणांनी प्रसादला बाहेर बोलावून मारहाण करु लागले यांची माहिती त्याच्या मित्राना कळताच त्यांच्या मदतीला गेले.या वेळी चार पाच जणांनी प्रसादवर चाकूने वार केले.त्याच्या बरगडीत गुप्ती सारख्या धारदार शस्त्राचा घाव जोरात लागल्याने प्रसाद खाली पडला .तर त्याचा मित्र सौरभ याच्या कमरेवर ,हातावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याने त्यात तो जखमी झाला.हा प्रकार हायस्कूल मध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात समजताच हा कार्यक्रम थांबविण्यात आला.
या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली.घटना स्थळी आणि रुग्णालयाच्या आवारात त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रानी गर्दी केली होती.यातील जखमीवर सांगली येथे सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
या वेळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे ,पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट दिली.यातील संशयीत अल्पवयीन असल्याची शक्यता असल्याचा पोलिसाचा अंदाज आहे.यातील मयत प्रसाद हा एकुलता होता.तो अकरावीत शिकत होता.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.