प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.९ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने" महाराष्ट्र विधानसभेचे निकाल व पुढील राजकारणाची दिशा " या विषयावर जाहीर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. अशोक चौसाळकर आहेत. तर चर्चासत्रात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ.प्रकाश पवार आणि ज्येष्ठ पत्रकार व संपादक डॉ. दशरथ पारेकर हे मांडणी करणार आहेत .मंगळवार ता.१० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे.तरी या चर्चासत्रास नागरिक बंधू भगिनींनी घ्यावे असे आवाहन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.