प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका, मॉडर्न हायस्कूल इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्यूटिव्ह, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरातील मॉडर्न हायस्कूलमध्ये स्थापन करणेत आलेल्या सुभाष खोत विज्ञान नगरी येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये झालेल्या स्पर्धेत मोठ्या गटात शहापूर हायस्कूल शहापूर तर लहान गटात दि न्यू हायस्कूल इचलकरंजी ने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये १२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रभारी आयुक्त सुषमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आय.जी.एम. हॉस्पिटल मधील सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सरस्वती प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. इचलकरंजी महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. याचा परिणाम म्हणून यावर्षी महानगर पालिकेच्या शाळेत तब्बल साडेचारशे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच चांगले कार्य केले आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या कार्याचा आढावा घेऊन टीम वर्कमुळे हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाल्याचे नमूद केले.
डॉ. जयश्री खोत म्हणाल्या इचलकरंजीच्या इतिहासात एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सुभाष खोत यांनी मान मिळवला त्यामध्ये इचलकरंजी शहराचा मोठा वाटा आहे. सुभाष याला मिळालेली बुद्धी दैवी देणगी आहे.अत्यंत प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी उत्तुंग असे यश मिळवले आणि यामुळे इचलकरंजीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. मनाची एकाग्रता हीच यशाची पायरी आहे.मोबाईल आणि सोशल मीडिया पासून मुलांनी योग्य वेळी बाजूला झाले तर सुभाष सारखे अनेक थोर शास्त्रज्ञ घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी आयुक्त सुषमा शिंदे यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून इचलकरंजी मध्ये नवनवीन संशोधक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.विज्ञान प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्व संयोजकांचे आभार मानले. यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष सतीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे,मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष हिमानी चाळके पाटील, रोटरी एक्झिक्यूटिव्हचे गणेश निकम,परीक्षक सागर चुडाप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमा जाधव व सरिता मोरे यांनी केले.आभार शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी मानले. त्यानंतर राजेश पिष्टे सर यांनी निकाल जाहीर केला.
गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे
सहावी ते आठवी :
प्रथम क्रमांक दि न्यू हायस्कूल
उपकरण ब्लब लावणे काढणे विद्यार्थिनी स्वरा विश्वास सोळांकुरे
द्वितीय क्रमांक बापूजी साळुंखे हायस्कूल
उपकरण अंधासाठी काठी व बूट विद्यार्थी रोहित किरण कांबळे
तृतीय क्रमांक कुसुमताई विद्यामंदिर उपकरण कार्बन प्युरीफिजेशन
विदयार्थी मानवी सागर शेलार
उत्तेजनार्थ क्रमांक
१.महानगरपालिका शाळा क्रमांक ५७ उपकरण कचरा वेचणारे मशीन
विद्यार्थी अर्शलान इम्तियाज मोमीन
२.शहापूर हायस्कूल
उपकरण बेस्ट सेफ्टी फॉर वुमन
विद्यार्थी चैतन्य रवींद्र म्हेत्रे
नववी ते बारावी गट:
प्रथम क्रमांक शहापूर हायस्कूल उपकरण भरणी यंत्र
विद्यार्थी आदित्य आनंदा कुंभार
द्वितीय क्रमांक रा.छ.शाहू हायस्कूल उपकरण स्मार्ट RTO सिस्टीम
विद्यार्थी वरद महेश गुंडी
तृतीय क्रमांक श्रीम.गंगामाई गर्ल्स हायस्कूल
उपकरण सेव्ह क्लोथ फ्रॉम रेन
विद्यार्थी आंचल दशरथप्रसाद गुप्ता
उत्तेजनार्थ
१.मणेरे हायस्कूल
उपकरण नैसर्गिक शेतीतून कचरा व्यवस्थापन
विद्यार्थी श्रुती राजाराम गोळ
२.नाईट हायस्कूल इचलकरंजी उपकरण सौर किट विद्यार्थी अथर्व देवराज शेठ
*प्राथमिक शिक्षक अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य*:
१.संतोष चव्हाण एन डी मगदूम प्राथमिक विद्यामंदिर
साहित्य मनोरंजनातून शिक्षण
२.रजनी राजेंद्र घोडके माई बाल वि.मं. उपकरण डिजिटल प्रणालीतून गणितीय शिक्षण
३. गीता विजय लोहार
आदर्श वि म.
उपकरण भौमितिक आकार
माध्यमिक शिक्षक*:
१.एम व्ही फडके इचलकरंजी हायस्कूल उपकरण प्रकाशिय उपकरणे
२.बी जे कोळी शहापूर हाय.
उपकरण बहुउद्देशीय उपकरणे
३.अर्चना संभाजी डकरे
उपकरण शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा
सहाय्यक परिचर* :
१.रतन काळे बालाजी हायस्कूल
उपकरण विद्युत चुंबक
दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थी सलोनी शरद जगदाळे
शैक्षणिक साहित्य बेलाचे आरोग्यदायी फायदे
ताराबाई गर्ल्स हायस्कूल.
इरफान पटेल
प्रशासन अधिकारी
इचलकरंजी महानगरपालिका
शिक्षण विभाग