प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगर पालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचा विद्यार्थी यश अविनाश साळुंखे याने सातारा येथे विभाग स्तरावर झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल तसेच सई सुहास शिंदे हिने विभागीय स्तरावर जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल महानगरपालिकेच्या वतीने प्र. आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांच्या हस्ते आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यश साळुंखे आणि सई शिंदे या दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार, विद्युत अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, क्रीडा शिक्षक तुषार जगताप, महेंद्र आयरेकर, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सुभाष आवळे यांचेसह महानगरपालिका अधिकारी,शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित उपस्थित होते.