प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी मनपा , जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा आणि प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले होते
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील उपजिल्हा अध्यक्ष (उत्तर विभाग) प्रहार संघटना इचरकंजी महिला अध्यक्षा अंजना नेतले सदस्य प्रहार संघटना ईश्वर फडतरे सदस्य प्रहार संघटना तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विकास वीरकर साहेब (दिव्यांग विभाग अधिकारी मनपा इचलकरंजी) मा. डॉ. सुरेखा नीटवे व नीलम येसाटे यांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. जे.बडबडे सर अध्यक्ष जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच दिशा प्रशालेच्या प्रमुख डॉ. जे.पी.बडबडे मॅडम उपस्थित होत्या.
याप्रसंगी पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्रमुख मुख्याध्यापक एस. एम. लोंढे यांनी केले कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करून करण्यात आले. पाहुण्यांची ओळख सौ.कुसुम कांबळे मॅडम यांनी केली. यावेळी पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री. पी.जे.बडबडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. मा. श्री.सुनील पाटील सर यांनी दिव्यांग दिनाविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले तसेच मा. श्री. विकास विरकर सर यांनी महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व शेवटी संस्थेस सर्वपरी सहकारी करण्याचे आश्वासन दिले.
डॉ.जे. पी. बडबडे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या व प्रशालेच्या विविध शैक्षणिक उपक्रमाचा आढावा दिला. सदर कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार श्री रवींद्र पाटील सर खजिनदार संजय कोले सर संस्थेचे सेक्रेटरी तसेच दिशा प्रशालेचे उपाध्यक्ष अशोक मगदूम व सेक्रेटरी अजित बलवान यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसविता कोळी यांनी केले तर आभार कांबळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जागतिक अपंग दिनानिमित्त आज प्रशालेमध्ये मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या. यावेळी सर्व शिक्षक व सहकारी उपस्थित होते.
सावली संस्था व इचलकरंजी महानगरपालिका वतीने ही दिव्यांगांच्या करिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.राजकुमार गेजगे व भगवान जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.