शहापूर येथील घरफोडी प्रकरणी एकास अटक .चार लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

इंचलकरंजी - शहापूर येथे घरफोडी प्रकरणातील चार लाख रुपयांच्या चोरीतील रेकॉर्डवरील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण   पथकाने ताब्यात घेऊन अटक केली.चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी संशयीत आरोपी अस्लम बाबू सनदी (वय 33.रा.कृर्षी बाजार समितीच्या पाठीमागे ,अथणी ) याला अटक केली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .या अनुशंगाने घरफोडी गुन्हयांची माहिती घेऊन तपास चालू केला असता या पथकातील    पोलिसांना शहापुर पोलिस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेंगार अस्लम बाबू सनदी केला असून तो चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी टोप येथे असलेल्या हॉटेल दुर्गामाता येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता ( दि.17) रोजी त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्याच्या सोन्याचे दागिने मिळुन आल्याने त्याच्याकडे या बाबत चौकशी केली असता त्याने शहापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्यातील चोरीचे दागिने असल्याचे सांगितले.पोलिसांनी आरोपी कडुन चार लाख रुपये किमंतीचे 59.ग्राम.वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला मुद्देमालासह शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपी अस्लम सनदी याच्यावर कर्नाटक राज्यात 11 घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हयातील आजरा ,गडहिग्लज आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून शहापूर पोलिस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे व सांगली जिल्ह्यात एक असे एकूण 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,आतिष म्हेत्रे पोलिस महेश खोत,सतीश जंगम,महेश पाटील,संजय कुंभार ,प्रदीप पाटील आणि सुहास पाटील यांच्यासह आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post