प्रेस मीडिया लाईव्ह :
इंचलकरंजी - डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत होमगार्ड उपपथकाचे अधिकारी सेवा निवृत्त अधिकारी संजय सदाशिव वडिंगे (वय58) आणि सौ.सुनिता संजय वडिंगे (वय 55.रा.रिंगरोड ,मंगळवार पेठ) या पती पत्नीचा मृत्यु झाला.या अपघाताची नोंद इंचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यात चालू होते.
इंचलकरंजी परिसरात असलेल्या मंगळवार पेठ येथील संजय वडिंगे आणि सौ सुनिता वडिंगे हे पती पत्नी पंचगंगा नदी काठावर असलेल्या वरदविनायक मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.देवदर्शन घेऊन मोटारसायकल वरुन जात असताना बोरगांव कडुन इंचलकरंजीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या डंपर खाली मोटारसायकल सापडल्याने सौ.सुनिता वडिंगे यांच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.तर त्यांचे पती संजय वडिंगे यांच्या कंबरेवरुन चाक गेल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केले.त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.पती आणि पत्नीचा अपघाती मृत्यु झाल्याने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघात घडलेला मार्ग वहातुकीसाठी धोकादायक असल्याने या ठिकाणी लहान मोठे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.अपघात स्थळी वहातुकीची कोंडी झाली होती.
या अपघातास कारणीभूत असलेल्या डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम इंचलकरंजी येथे गावभाग पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत चालू होते.