हुपरी येथील धडाडीचे पत्रकार अमजद नदाफ यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन , हुपरी व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

हुपरी नगरपालिका व्हायलाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वृत्तपत्रांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून सतत जोरदार लढा देऊन अखेर यशस्वी ठरलेले दैनिक पुढारीचे धडाडीचे साहसी पत्रकार व राजस्थान राज्यातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे झालेल्या शासनाच्या दुर्लक्षामुळे सदर पुतळा व परिसर सुशोभित करण्यात पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणा जागी करून कामाला लावणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अभ्यासु व तडफदार व्यक्तीमत्व आणि हुपरी नगरपालिकेचे स्विकृत नगरसेवक म्हणून कामगिरी बजावली आहे अशा आदरणीय श्री अमजदभाई नदाफ यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना पाठबळ देणाऱ्या तसेच गेल्या 4 वर्षापासून गंभीर आजाराशी सामना देत असलेल्या अमजदभाई यांची एखाद्या लहान मुलांप्रमाणे सेवा शुश्रूषा करणाऱ्या त्यांच्या खंबीर पत्नी- सौ. रजिया नदाफ, भाभी यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दु:खद निधन झाले आहे आणि अमजद भाई व एका लहान मुलाला पोरके व्हावे लागले हे एक दुर्दैवी आहे. त्यामुळे समस्त हुपरी व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post