विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने आलेल्या बुद्ध अनुयायी यांना अन्नदान भोजनदान वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड. : दि. २६ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल पुणे जिल्हा प्रमुख लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे सर व असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा ट्रस्टी रिपोर्टिंग अध्यक्ष ॲँड.सुभाष जौंजाळे , राष्ट्रीय सचिव बि. एच. गायकवाड,महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष भिकाजी कांबळे ,सन्माननीय अध्यक्ष यु जी बोराडेसह महाराष्ट्र व केंद्रातील कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते,
समता सैनिक दलाच्या वतीने सालाबाद प्रमाणे मेडिकल कॅम्पच्या आयोजन करण्यात आले होते समता सैनिक दलाचे सैनिक डॉ. राजू सोनवणे सर व त्यांच्या सहकार्यानी बुद्ध चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या अनुयायांचे बी.पी., शुगर,सर्दी,खोकला इत्यादी आजारांवर प्राथमिक उपचार करण्यात येत होते, यावेळी हजारो आलेल्या अनुयायांनी आपले विविध आजार तपासुन घेतले
पुणे जिल्ह्यातून समता सैनिक दल व अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
बुद्धमूर्ती वर्धापन दिनाच्या निमित्ताने कँन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पथसंचलन करीत सलामी देण्यात आली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो असे गगनभेदी घोषणा देत देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पासुन ते ऐतिहासिक बुद्ध विहार धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी समता सैनिक दलाचे पथ संचलन करण्यात आले, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत उभे राहून जुना पुणे मुंबई महामार्गावरून बाजारपेठ ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौक येथुन सराफ बाजार येथुन पथसंचलन करीत ऐतिहासिक धम्मभुमी येथे पहुंचले येथे
समता सैनिक दलातील सैनिकांसाठी गोळाफेक,भालाफेक,लेझीम, ड्रिल, लाठी काठी इत्यादीचे कला क्रिडा प्रत्याक्षित कला दाखवत उपस्थित लोकांचे मने जिंकुन सर्वांना मंत्र मुग्ध केले स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणाऱ्या सैनिक आशा माने यांच्याकडून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी झालेल्या सैनिकांची निवड करण्यात आली व सर्व सैनिकांना उत्तेजनार्थ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला,
क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेजर एम. डी.लोंढे, बाळासाहेब पाटोळे,सुभाष कांबळे किरण अल्हाट, नागसेन ओव्हाळ, राजरतन थोरात,सीनियर डिव्हिजन ऑफिसर अजय जाधव, डिव्हिजन ऑफिसर दत्ता शिंदे, प्लाटून कमांडर प्रकाश कांबळे,अशोक कदम,मनोज वाकोडे,रोहित वाकोडेसह महिला सैनिकांनी अथक प्रयत्न केले,
बुद्धमूर्ती वर्धापन दिन व स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस भगवान शिंदे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केले,पुणे शहर जिल्हा महिलाध्यक्षा सुजाता ओव्हाळ यांनी स्त्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले,याप्रसंगी पुज्यनिय भिख्खू महाथेरो यांनी उपस्थित अनुयायांना त्रिसरण पंचशील दिले,
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी उपस्थित होते,
पुणे जिल्हा व तालुका पुरुष व महिला कार्यकारणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संजय आगळे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे मनोगते व्यक्त करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी आभार मानले व सरणत्तय घेऊन कार्यक्रम सपन्न करण्यात आला. तर ऐतिहासिक धम्मभुमी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने ७० व्वा वर्धापनदिनानिमित्त व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान भोजनदान करण्यात आले ३०० किलो पीठाचे पुरी भाजी तसेच पुलाव हे वाटप करण्यात आले दुपारची वेळ असल्याने अनुयायांनी खुपचं गर्दी केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला भोजन दानाला जास्त वेळ लागत असल्याचे लक्षात येताच आलेल्या महिला अनुयायी यांनी स्वतःहुन या कार्यक्रमात सहभाग होऊन पुरी भाजी व पुलाव बनविले व सहकार्य केले या कार्यक्रमाचे नियोजन सुनिल गायकवाड व दिलीप कडलक अशोक चव्हाण शंकर दोडमणी बाबु दुधघागरे उत्तम अलकोंडे लाला भालशंकर प्रमोद भोसले असे २५ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले देहूरोड येथील सुप्रसिध्द असे नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सालाबादप्रमाणे ऐतिहासिक धम्मभुमीवर आलेल्या अनुयायीना संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष बेटी पढाओ बेटी बचाव चे प्रणेते ईश्वर सेठ अगरवाल संस्थेचे उपाध्यक्षा अनिता अगरवाल व संस्थेचे संचालक व शिवसेना नेते (शिदे गट) चे देहूरोड शहर अध्यक्ष दिपक चौगुले व कार्यकर्ते यांनी आलेल्या अनुयायीना चहा नाश्ता पाणी पोहे हे संस्थेच्या वतीने वाटप केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार समोर ऐकता ग्रुप धम्मभुमी देहुरोड सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान पाणी वाटप करण्यात आलेयुवा नेते राजा पिल्ले यांचे द्वारे एकता ग्रुप देहूरोड च्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले.
या प्रसंगी शिवकुमार कुप्पुस्वामी ( बल्ली आण्णा ), बाबु आप्पा दुराई, राजाराम अस्वरे दादा, के. एच. सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, मोहीत कदम, हेमंत राऊत, धिरज नायडू, पत्रकार चंद्रशेखर पात्रे सह विविध मान्यवरांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत सुरु असलेल्या या उपक्रमात हजारों अनुयायांनी भोजनाचा आस्वाद घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या वतीने देहुरोड बाजारपेठ येथे गांधी घौसर यांच्या अध्यक्षतेखाली अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी भारतीय संविधान सन्मान समिती चे समन्वयक व खजिनदार विजय पवार सह खजिनदार प्रकाश कांबळे (रुईकर) बाबु हिरमेठकर समितीचे सहसचिव परशुराम दोडमणी ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन चे पुणे जिल्हा सचिव व पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी अन्नदान वाटप केले.