डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वात बुद्धिमान व्यक्ती बाबासाहेब वाचाल तर जीवनात वाचाल :- खासदार श्रीरंग बारणे
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. २६ ऐतिहासिक देहूरोड धम्मभूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी प्रथम बुद्धरुप बसवून धम्माचा प्रारंभ केला या सत्तर व्वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाने संपन्न झाला
चैत्यभूमी धम्मभूमी आणि दीक्षाभूमी असा त्रिवेणी संगम असलेल्या देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीत विविध राज्यातुन आलेल्या लाखो बुद्ध बांधवांनी नतमस्तक होऊन भगवान गौतम बुद्धाचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले लाखो अनुयायीनी दर्शना साठी भले मोठे राग लागली होती बुद्ध विहार कृती समितीच्या वतीने सकाळी आठ वाजता विदर्भीय भीमसैनिकांचे स्वागत करून सामुदायिक वंदना घेण्यात आली सकाळी ८:३० वाजता विदर्भ धम्म भुमीचे सुरक्षा समितीचे अध्यक्ष संघपाल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली महाधम्म रॅली झाली ९:४५ वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले सकाळी अकरा वाजता मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रथम तथागत गौतम बुद्धाचे दर्शन घेतले व्यासपीठावर त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी बुद्ध विहाराबाबत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर अनेक लोक नतमस्तक होतात अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होत आहे हे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे राज्य सरकारच्या वतीने मोठा नीधी उपलब्ध होण्याची घोषणा केली गेली आहे या बुद्ध विहाराच्या कामाला ७० वर्ष पूर्ण होत आहे आणि आज हे काम पुर्ण होताना दिसत आहे आता वाद मिटला आहे आता सर्वानी आपसातील मतभेद विसरून एकत्रित पणे काम केले पाहिजे असे मला वाटते बाबासाहेब यांचे विचार घेऊन सर्व जण पुढे चालले पाहिजे डॉ बाबासाहेबांचे विचार सगळ्यांनी वाचले पाहिजे आपण बाबासाहेबांचे विचार वाचाल तरच आपण जीवनामध्ये वाचाल बाबासाहेब सारखे या जगात कोणी बुद्धीमान नाही कारण संविधानाच्या माध्यमातून अठरा पगड जातीला न्याय देण्याचे काम बाबिसाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे आता या वास्तूला मी राज्य सरकार व केंद्र शासनाच्या वतीने नीधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन ही जागा लष्करी खात्यामध्ये येत असल्याने मी अनेक वेळा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे भविष्या मध्ये हे काम पुर्ण होणार असे ही यावेळी त्यांनी म्हटले यावेळी बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व सर्व पुरस्कारार्थीना टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते धम्मभुमी स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात यावेळी धम्मदेसना देण्यासाठी वंदनीय भंत्ते ज्ञानज्योती महाथेरो हे उपस्थित नसल्याने धम्मदिक्षाचे कार्यक्रम व महाबुद्व वंदना बुद्ध नेते प्रबुद्ध साठे यांनी घेतले या वेळी वादीराज पाटील या ब्रह्माणाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि पिंपरी चिंचवड येथील मातंग समाजातील ओमप्रकाश चितळे यांचा परिवारासह विनोद चौधरी मंगेश चौधरी संजय कांबळे चंद्रकला सोनकांबळे साधना म्हस्के कलावती म्हस्के यांनी दिक्षा घेतली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध विहार कृती समिती, अष्टप्रधान मंडळ, धम्मभुमी सुरक्षा समिती धम्म भुमी महिला संघ, जेष्ठ उपासिका संघ यांनी केले तर सुत्र संचालन अष्टप्रधान मंडळाचे धर्मपाल तंतरपाळे दिपक म्हस्के, डॉ किर्ती पाल गायकवाड यांनी केले आभार प्रकट यमराज इंगळे यांनी मानले.या ७० व्वा वर्धापनदिनानिमित्त धम्मभुमी येथे अनेक संघटनेच्या वतीने व राजकीय पक्षाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत अनेक ठिकाणी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भोजन दान करण्यात आले अनेक पुस्तके व खाद्यपदार्थसह विविध वस्तू चे दुकानें मांडले होते यामुळे वर्धापनदिनाला जत्रेचे स्वरूप आले होते रात्री उशिरापर्यंत बुद्ध अनुयायी हे तथागत गौतम बुद्ध यांचे दर्शन घेत होते या कार्यक्रमा दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी कुठले ही अनुचित प्रकार घडू नये या साठी सीसीटीव्ही कॅमेरे सह कडी नजर ठेवण्यात आले होते व २७० पोलीस अधिकारी सह ३०० पोलीस कर्मचारी होमगार्ड असे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.