आज तुम्ही आम्ही जे काही आहे ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच बाबांना त्रिवार अभिवादन केलेच पाहिजे :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
देहुरोड दि. परमपुज्य डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त देहूरोड शहरात शांतीज्योत रॕली काढुन हातात मेणबत्ती ज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यास देहुरोड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व संविधान सन्मान समिती रॅली चे प्रमुख सल्लागार के एच सुर्यवंशी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथे संविधान प्रदान फलका जवळ देहूरोड पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक लखन कुमार वाव्हळे डॉ रामदास ताटे ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन चे चंद्रशेखर पात्रे समितीचे समन्वयक रजाक शेख मानव आधार सामाजिक संघटनांचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर समितीचे खजिनदार विजय पवार सह खजिनदार प्रकाश कांबळे, समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते संजय शेंडे आदिनी मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जनरल हॉस्पिटल येथे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र बदल मनोगत व्यक्त करताना म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून प्रत्येक देशवासीयांना सर्व समान न्याय हक्क मिळवून दिला आहे आणि संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र बंधुता लोकशाही अमलात आणले आज तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालत आहे आजचा दिवस हे खुपच दुखाचा दिवस आहे म्हणून आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण सर्वजण बाबासाहेबाना विनम्र अभिवादन करण्यासाठी जमलो आहे आणि सर्वानी केले ही पाहीजे असे मनोगत व्यक्त करून बाबासाहेबाना मानवंदना दिली या वेळी भारतीय संविधान सन्मान समिती चे अध्यक्ष रामदास ताटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज खुप दुःखाचे दिवस आहे आज आनंद साजरा करता येत नाही व जोर जोरात जयघोष करता येत नाही पण बाबासाहेबाना मानवंदना विनम्र अभिवादन करत जब तक सुरज चांद रहेगा डॉ बाबासाहेब आंबेडकर तेरा नाम रहेगा अशी दुखद घोषणा केली .
यावेळी उपस्थित लोकांनी हातात मेणबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व हातात मेणबत्ती प्रज्वलित ज्योत घेऊन शांति रॅली काढण्यात आली यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे सहायक उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळे व उपस्थित लोकांनी एका रांगेत उभे राहून बुद्धम शरणम् गच्छामी, धम्मम शरणम् गच्छामी म्हणत ही शांति ज्योत रॅली पुणे मुंबई महामार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथुन मुंबई पुणे रोडवरून विवेकानंद चौक वरून सवाना उपहारगृह तेथुन अबुबकर मार्ग, वृंदावन चौक, महात्मा फुले मंडई ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक देहूरोड सराफ बाजार येथुन बुध्दम शरणम् गच्छामी धम्मम शरणम् गच्छामी म्हणत ही शांति ज्योत रॅली ऐतिहासिक बुद्ध विहार येथे आले असता येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत शांति रॅली संपन्न झाली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्तुपा जवळ सर्वांना अभिवादन करत बुद्ध वंदना घेतली येथे समिती व संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक के एच सुर्यवंशी ,सकल मराठा समाजाच्या वतीने युवा नेते धनराज शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले तर संविधान सन्मान समिती रॅली चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी मनोगत व्यक्त केले या शांति रॅलीचे आयोजन भारतीय संविधान समिती रॅली संयोजन समिती देहुरोड शहर प्रंचक्रोशी, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व महिला आघाडी,मानव अधिकार सामाजिक संघटना व देहूरोड शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक व राजकीय नेते उपस्थित होते शांति ज्योत रॅली काढण्यात आले असता देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने सुरक्षाव्यवस्था चौख ठेवण्यात आले दोन पोलिस गाडी व पोलीसाचा ताफा सह पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळे व त्याचे सहकारी कर्मचाऱ्यांनी केले.