प्रेस मीडिया लाईव्ह :
मुलं हे देवाघरची फुलं असतात. मुलं देशाचे उद्याचं भवितव्य असतात. मुलांना घडवण्यासाठी शिक्षक मदत करतात. त्यांच्या योग्य वाढीसाठी शिक्षक मदत करतात. मात्र आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला आहे. आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीच मुलांना हिन दर्जाची वागणुक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील संगोपन केंद्रातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत, अनाथ निराधार मुलांना शिक्षण देतात. मात्र येथील काही शिक्षकांनी अनाथ निराधार मुलांना हिन दर्जाची वागणूक दिली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतील शौचालय, शाळा साफसफाई करायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. तसेच स्थानिक नागरीकांनी देखील शिक्षकांविरोधात रोष व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच आंबेगाव तालुक्यातील तीन महिला शिक्षकांसह एक पुरुष शिक्षक अशा चार शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात शिक्षक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.