प्रेस मीडिया लाईव्ह :
परभणी येथे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शव विच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांच्या दमनशाही चा हा अत्यंत लज्जास्पद प्रकार आहे. पोलिसांच्या बेजबाबदार वर्तनाला उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा जबाबदार असून या सर्वांवर तातडीने गुन्हे नोंदवले जायला हवेत. आम आदमी पार्टी या सर्व घटनेचा तीव्र निषेध करते.
संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले. यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता. त्यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.
Aam Aadmi Party Maharashtra #VBA #rpi
#परभणी