प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- घरातील अघोरी शक्तींचा नायनाट करण्याचे आमिष दाखवून नऊ जणांनी वृध्दास ८४ लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणातील संशयित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३२, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग) हिला बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.तिच्याकडे तपास केल्यानंतर तिने मुख्य संशयीत दादा पाटील महाराज याने एकदा फिर्यादींशी ओळख करून दिली होती. त्यानंतर दादा पाटील यांनी ऑनलाईन २५ हजार रुपये पाठवले. या गुन्हयात सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान महिला कॉ.तृप्ती मुळीक हिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंगावेश परिसरात रहात असलेले सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना मानसिक समाधान नव्हते. तसेच घरात अनेक अडचणी येत असल्याने त्यांनी संशयित दादा पाटील महाराज-पाटणकर याच्यासह नऊ जणांच्या सल्लयाने घरात अनेक धार्मिक विधी केले. त्यासाठी नऊ जणांनी लाखो रुपयांचे सोन्याचे ऐवज हड्डप केला होता. अशा प्रकारे संशयीत आण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री काळभोर, गोळे, कुंडलिक झगडे, पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक, ओंकार, भरत, हरीष अशा नऊ जणांनी ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल आहे.
आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पहिल्या टप्प्यात दोघांना अटक केली. या गुन्ह्यात सिंधुदुर्ग पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी बुधवारी तृप्ती मुळीक हिला अटक केली. तिला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचे एक पथक सिंधुदुर्गला तेथील तिच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले आहे.