प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकीहाळ ता 17 येथील साहित्य संस्कृती शेती विचार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने फाऊंडेशन चे सदस्य ऐम ऐस चौगुले बेडकीहाळ निवृत्त प्रा अजित सगरे निपाणी सदस्य के व्ही बंडा जोशी यांच्या पत्नी वसुधा जोशी नेज चंद्रबाई चौगुले यांच्या साठी शोक सभा आयोजित करण्यात आले होते .
या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश देसाई हे होते तर फाऊंडेशनचे अध्यक्ष डी एन दाभाडे प्रमुख होते उपस्थित सदस्य अध्यक्ष यांच्या हस्ते एम एस चौगुले व वसुधा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी कलगौडा पाटिल एस बी निंबाळकर यांनी शोक सभेला उद्देशून आपले विचार मांडले तर प्रशांत चौगुले यांनी समतावादी प्रबोधन प्रसाद कुलकर्णी यांनी पाठवलेला संदेश वाचणं केले तर डि एन दाभाडे यांनी एम एस चौगुले हे पुरोगामी विचारांचे व पुरोगामी वारसा जपणारे सर्व धर्म समान आहेत ईतर धर्म कमी लेखू नये असा संदेश देणारे गांधी विचारांचे पुरोगामी नेते होते तर अजित सगरे हे या परीसरात ऐक चांगले साहित्यिक व वक्ते म्हणून प्रसिद्ध होते याच बरोबर वसुधा जोशी या आदर्श माता होत्या
अध्यक्ष स्थानी बोलताना सुरेश देसाई म्हणाले आमच्या फाऊंडेशन मध्ये परखड पण आपले मत व्यक्त करणारे वाईटाला वाईट म्हणवणारे चांगल्या चांगले म्हणवणारे फाऊंडेशन साठी सतत झटणारे फाऊंडेशन कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबाचा आधार युक्तीने गमावलेच वाईट वाटते त्यांचे विचार असेच पुढे ठेऊन फाऊंडेशन चालत राहावे असे ते पुढे म्हणाले व दोन मिनट शांत राहून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली