प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
हातकणंगले तालुका येथील अतिग्रे येथे परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या भारतीय राज्यघटनेची प्रतिमेची विटंबना झाले असून त्या घटनेला अनुसरून हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सोमनाथ सूर्यवंशी यांना समस्त बौद्ध समाजाच्या वतीने दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अतिग्रे गावातील नागरिकांनी आपला व्यवहार बंद करून सहकार्य केले बद्दल संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र कांबळे, जिल्हा सचिव आम आदमी पार्टी श्री संजय सूर्यवंशी, आरपीआय शाखाध्यक्ष श्री प्रज्योत सूर्यवंशी, हातकणंगले तालुका काँग्रेस युवा अध्यक्ष आकाश मधाळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरगावे, महेंद्र कांबळे,, सूर्यकांत कांबळे, अशोक सूर्यवंशी, महावीर कांबळे, अमित ओवाळे, कौतुक कांबळे, प्रमोद कांबळे, प्रमोद कांबळे, सचिन कांबळे, समीर शिंदे, व समस्त बौद्ध समाज अतिग्रे