देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अतिग्रेत भव्य शालेय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी :  भरत शिंदे...

अतिग्रे तालुका हातकणंगले येथे माजी आमदार श्री राजीव आवळे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या संयोजनाने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धा नात्यातील संवाद स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही स्पर्धा रुकडी फाटा अतिग्रे येथून चोकाक व माले फाटा पर्यंत घेण्यात आली लहान गट व मोठा गट विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली या स्पर्धेला पंचक्रोशीतून जवळपास ४६०  प्लस विद्यार्थी व पालक होते या स्पर्धेमध्ये पायोनियर हायस्कूल अतिग्रे ,किसनराव आवळे कोरोची ,रामराव इंगवले हातकलंगले ,फिनिक्स स्कूल अतिग्रे ,महात्मा गांधी रूकडी ,काकासाहेब माने रुकडी ,राष्ट्रसेवा शिरोली ,व परिसरातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला तसेच या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व पालक या सर्वांनी झुंबा नृत्य सादर केले या झुंबा नृत्यासाठी सावंत सर यांनी मार्गदर्शन केले 

  या कार्यक्रमास उपस्थिती आमदार राजीव आवळे, पायोनियर हायस्कूल मुख्याध्यापिका सौ स्मिताआवळे, हातकलंगले तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा अध्यक्ष एडवोकेट राहुल आवळे, हातकणंगले तालुका महिला उपाध्यक्ष शारदा पाटील, अतिग्रे उपसरपंच भगवान पाटील, यशवंत पाटील, पायोनियर हायस्कूल माजी मुख्याध्यापक एकनाथ पाटील सर, युवा उद्योजक संग्राम पाटील, पायोनियर हायस्कूल अतिग्रे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी उपस्थित होते 

   सदर कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थी व पालक यांना मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले विशेष करून स्पर्धेमध्ये विद्यार्थी बरोबर पालक यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल विशेष गिफ्ट देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post