हृदय रोगाचा त्रास होत असेल तर मग , वाचाच..!

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतामध्ये हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे त्यामागे कारनेही तशीच आहेत वाढता ताण -तणाव, व्यावसायिक चढ -उतार, अनिद्रा यामुळे आधी उच्च रक्तदाब, हार्ट ब्लॉकेज आणि नंतर हार्ट अटॅक अशा स्टेजेस पाहायला मिळतात. अटॅक च प्रमुख कारण म्हणजे "कोरोनरी आर्टरिज ब्लॉकेजेस "


हृदय रोगाची लक्षणे -

धाप लागणे, छातीत दुखणे, दर दरून घाम येणे, पायावर सूज, उच्च रक्तदाब,धड धड होणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी बहुदा या पैकीच लक्षणे दिसून येतात.

हृदय रोगाची कारणे -


अति मसालेदार पदार्थ,पित्त कारक आहार,तेलकट पदार्थ, अति मांसाहार, तंबाखू,आहारातील साध्या मिठाचे (समुद्री मिठाचे )जास्त प्रमाण, स्ट्रेस, चुकीची दिनचर्या, मलबद्धता, अनिद्रा हि कारणे असू शकतात.

अपथ्य (काय खाऊ नये )-


शेंगदाणे, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही,उडीद, पापड, लोणचे, दही, नॉनव्हेज, मैदा, म्हशीचे दूध, गव्हाचे अन्न, तूर डाळ, पोहे, काजू, तूप, लोणी, डालडा, मुळा, आळू, तिळ, मोहरी, चहा, साधे मीठ (समुद्री मीठ ), बटाटा, रताळी, वांगी, पित्तकारक आहार, कोल्ड्रिंक.


पथ्य (काय खावे )-


ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, मुगडाळ,दुधी भोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, गवारी, भेंडी, मनुके, शेवगा, ढबू मिरची, ओले खोबरे, पालेभाज्या, ताक,सैंधव (उपवासाचे मीठ )आंबील, घेवडा, ज्वारीची भाकरी,भात, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, लिंबू, नारळ पाणी, कांदा, लसूण, मध, जवस, देशी गाईचे दूध वापरावे

आयुर्वेदिक औषधे -


सर्पगंधा वटी, हृदयामृत वटी, अर्जुनारिष्ठ, अकिक पिष्टी, संगेयशव पिष्टी, जहरमोहरा पिष्टी.

उपाय -


1) साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ (उपवासाचे मीठ ) वापरावे

2) सकाळी पहाटे ऐवजी संध्याकाळी चालायला जाणे कारण थंडीत सकाळी रक्त गोठण्याचे प्रमाण दुपटीने वाढते

3) पुरेशी झोप, अनुलोम विलोम योगा करावा.

4) जास्तीत जास्त व्हिटॅमिन युक्त आहार घ्यावा. सलाड, भाज्या, फळे यांचे प्रमाण वाढवावे.

5) सकाळी 1ग्लास गरम पाणी प्यावे.6) जवस पावडर दिवसातून 2चमचे 2वेळेस खावी (बॅड कोळेस्टे्रोल कमी होतं )

7) आहारामध्ये कच्च्या लसूनचा उपयोग करावा (हार्ट अटॅक /लकव्यापासून संरक्षण होते )

8) दुधीभोपाळ्याचा आनुशीपोटी 1ग्लास रस प्यावा हि क्रिया किमान 41 दिवस करावी (ब्लॉकेजेस दूर होतील )

9) आमलकी, सर्पगंधा, दालचिनी, अर्जुन या चोघांचे चूर्ण एकत्रित करून 2चमचे,दिवसातून 2वेळेस 1वाटी कोमट पाण्यातून घ्यावे.

10) पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यावे (हृदय रोगापासून मुक्ती मिळते )

11) पंचगव्य नस्य दोन्ही नाकपुड्यात सकाळी व रात्री घालावे (झोप चांगली लागते व चिडचिडेपणा कमी होतो )

12) आठवड्यातून एकदा तरी स्टीम बाथ घ्यावा (कोलेस्टे्रोल व मेद बर्न होते )

13) हृदयाला बल मिळण्यासाठी ताडासन, भुजंगासन, वृक्षासन, उत्कटासन, वीरभद्रासन हे 5 योगा नियमितपणे करावेत.

14) अंजनी मुद्रा दररोज सकाळी व संध्याकाळी 15-15 मिनिटे केल्यास निश्चित लाभ मिळतो.

15) दालचिनी मुळे रक्त नैसर्गिकरित्या पातळ राहण्यास मदत मिळते.

16) ॲक्युप्रेशर /ॲक्युपंक्चर मुळेही लवकर रिसल्ट येतो.
.

डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.

कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.

संपर्क -9175723404, 7028612340

Post a Comment

Previous Post Next Post