पाच पैकी तिघांना अटक,तर दोघांचा शोध सुरु.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- तावडे हॉटेल परिसरात एका व्यावसायिला लुटल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संजय महादेव किरणगे (वय42) अभिषेक शशिकांत लगारे (वय24)आणि विजय तुकाराम खांडेकर (वय 28.सर्व रा. मणेरमळा उचगाव. कोल्हापूर ) यांना अटक करून त्यांच्या कडील लुटीतील 25 लाख रुपये आणि 30 लाख रुपये किमंतीच्या दोन गाड्या असा 55 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून स्वनिल तानाजी जाधव व हर्षद खरात या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी की,मंगळवार (दि.12)रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात सुभाष लक्ष्मण हारणे (रा.बागल चौक) या व्यावसायिकाला पाच जणांनी निवडणुक व्हिजीलन्स अधिकारी असल्याचे सांगून आचार संहिता असल्याने तुम्ही एवढी रोख रक्कम जवळ ठेऊ शकत नाही असे सांगून हारणे यांना चारचाकी गाडीत बसवून सरनोबतवाडीच्या दिशेने गेले होते.वाटेत त्यांच्याकडे असलेली 25 लाख रुपये असलेली पैशाची बँग आणि किमंती मोबाईल काढ़ुन घेऊन पैसे आणि मोबाईल परत मिळणार नाही असे सांगत त्यांना धमकावून खाली उतरण्यास भाग पाडले .आणि भरधाव वेगाने निघुन गेले.या घटनेने भांबवलेल्या हारणे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात पाच अनोळखी व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली.या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .या अनुशंगाने तपास करीत असताना हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील संजय किरणगे यांने आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.सदर आरोपी गोवा येथे गेल्याची माहिती मिळाली.या पथकातील पोलिस पथक गोवा येथे रवाना करण्यात आले असता त्या आरोपींचा शोध घेत असताना सर्व आरोपी कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राधानगर ते पुईखडी मार्गावर चारचाकीतुन आलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्या कडील टाटा हरियर आणि निशान कंपनीची गाडी जप्त करून लुटीतील 25 लाख रुपये आणि जप्त केलेल्या 30 लाख रुपये किमंतीच्या दोन गाड्या असा 55 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून या तिघांना पुढ़ील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तर फरारी आरोपी स्वनिल तानाजी जाधव व हर्षद खरात यांचा पोलिस शोध घेत आहेत.
याचा पुढ़ील तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस उपनिरीक्षक जालंदर जाधव पोलिस वैभव पाटील,गजानन गुरव प्रशांत कांबळे,समीर कांबळे चालक सुधीर पाटील आणि यशवंत कुंभार यांच्यासह आदीने केली.
----------------------------------------
लूटीतील रोख रक्कम परत मिळुन हा गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल आनंदाने भारावून गेलेल्या फिर्यादी हारणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.