पुण्यात कोण जिंकणार, कोण हरणार...?


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांचा विचार करता, वडगांव शेरी, शिवाजीनगर, काेथरुड, खडकवासला, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टाेन्मेंट, कसबा या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी कसबा वगळता सात मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. यामध्ये पाच भाजपचे असुन, दाेन आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आहेत.

भाजपकडून सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकतील असा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात विचार करता काेथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील यांची जागा सुरक्षित मानली जात आहे. त्यापाठाेपाठ पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे सिध्दार्थ शिराेळे यांची जागा सुरक्षित मानली जात आहे. पर्वती आणि शिवाजीनगरमध्ये काॅंग्रेसमध्ये बंडखाेरी झाल्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकताे. पुणे कॅन्टाेन्मेंट मध्ये भाजपचे सुनील कांबळे यांच्यासमाेर काॅंग्रेसचे रमेश बागवे हे रिंगणात असुन, ही लढत चुरशीची हाेण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेमुळे लढत तिरंगी झाली आहे. यामुळे काॅंग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने, मनसेचे गणेश भाेकरे यांच्यात लढत झाली आहे. या मतदारसंघात जेव्हा तिरंगी लढत हाेते, तेव्हा त्याचा फायदा हा भाजपला हाेताे असा अनुभव आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातही तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी मनसेचे मयुरेश वांजळे यांनी महायुतीचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि महाविकास आघाडीचे सचिन दाेडके यांच्यासमाेर आव्हान उभे केले आहे.

वडगांव शेरी आणि हडपसर या दाेन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दाेन्ही मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. वडगांव शेरीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासमाेर शरद पवार यांनी बापू पठारे यांचे कडवे आव्हान उभे केले आहे. तर हडपसर मध्ये विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासमाेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रशांत जगताप रिंगणात आले आहे. या दाेन्ही मतदारसंघात काेणती राष्ट्रवादी काॅंग्रेस बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post