प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सध्या सीपीआर रुग्णालयात सावळा गोंधळ कारभार चालू आहे.डॉक्टर वर्गात तर हम करोंसे कायदा चालू आहे.काही डॉक्टर शिकाऊ असून रुग्णांना चुकीचा सल्ला देत असल्याची माहिती समोर आली आहे.सीपीआर रुग्णालयात अपघात,गळफास,मारामारीत जखमी रूग्ण येत असल्याने त्यांना पोलिस वर्दी दिल्याशिवाय डॉक्टर त्या रुग्णांवर उपचार करीत नसल्याचे समजते.
त्यातच भर म्हणून सर्प दंश ,दमा ,श्वास घेण्यास त्रास या सारखे रुग्ण जरी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले तरी त्या वेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर पोलिस वर्दीत नोंद झाल्या शिवाय संबंधित उपचार करीत नाहीत या सारखे रुग्ण पोलिस केस नसून सुध्दा त्यांच्या केस पेपरची नोंद पोलिस डायरीत द्यावी लागते.उदा. द्यायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीला सर्पाने दंश केल्यास त्याचा उपचारा चालू असताना मृत्यु झाल्यास या घटनेत पोलिस कारवाई होत नसते. पण एखाद्या घटनेत रुग्णाचा अपघात, गळफास किंवा मारामारीत मृत्यु झाल्यास संबंधित व्यक्तीवर पोलिस कारवाई केली जाते.त्यामुळे याची दखल घेऊन संबंधित विभागाने कोणत्या घटनेचा पोलिस वर्दी द्यावी याचा विचार करावा .घातक रोग असलेल्या रुग्णांचा मृत्यु झाल्यास त्यांचे पोस्टमार्टम करण्यास डॉक्टर सांगतात पण अशा रुग्णा पासून दुसऱ्या व्यक्तीच्या जिवाला धोका होऊ शकतो.याची ही काळजी संबंधित विभागाने घ्यायला हवी.
परवाचीच गोष्ट रविवार( दि 10।11।24 ) रोजी पेठनाका इस्लामपूर येथील 18 वर्षीय युवक अथर्व राजेंद्र दीक्षित यास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला कोयना हॉस्पिटल इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. पण त्या रुग्णास रेबीज झाला असल्याने आम्ही ऍडमिट करू शकत नाही असे तेथील डॉक्टरांनी सांगून त्यांच्या नातेवाईकांला तुम्ही कोल्हापुर येथे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले . त्याला नातेवाईकांनी सोमवार (दि.11।11।24 ) रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तो खोकताना आवाज वेगळा येऊ लागला म्हणून त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांना शंका आल्याने त्या पेशंटला रेबीज झाल्याचे समजले.त्या वेळी डॉक्टरांनी हा अपघात विभाग आहे याठिकाणी यास आत घेता येत नाही यांच्यामुळे दुसऱ्याला याचा संसर्ग होऊ शकतो असे नातेवाईक याना सांगितले परंतु त्यातील एकाने फोन येथील डीन याना करायला लावला मग सगळी सूत्र फिरली आणि डीन यांनी रेबीज चा पेशंट असूनही त्याची mlc करायला भाग पाडले आणि त्यातच त्या पेशंटचा मृत्यु झाला.त्या मयताचे पोस्टमार्टम करण्यास ड्युटीवर असलेल्या पोलिसाला भाग पाडले. म्हणजे डीन साहेबांना माहीत नाही का की रेबीजच्या पेशंट ची पोलिसाला वर्दी करायला लावायची नसते .मग कोणत्या कायद्याने करायला लावली मग त्या कायद्यात बसत असेल तर यापूर्वी किती तरी रेबीज ने पेशंटचा मृत्यु झाला मग त्या मयताची पोस्टमार्टम त्या वेळी का केले नाही.
असा प्रश्न काहीनी उपस्थित केला. सीपीआर प्रशासनाला त्रास होऊ नये किंवा त्या संबंधित डॉक्टर यांचेवर तक्रार होऊ नये म्हणून तुम्ही क्लिनिकल पोस्टमार्टम करू शकत होता. आणि यापूर्वी क्लिनिकल पोस्टमार्ट्ंम केले आहे मग तुम्ही पोलिसाला आणि अपघात विभागातील लोकांना हा आजार माहीत असताना पण ऍडमिट करायला कसे काय लावू शकता ?
अपघात विभाग मधील शासकीय नोकरी करणारे याना रेबीज पेशंट आला तर स्वतःकाळजी कशी घ्यायची याची माहिती असते . परंतु अपघात विभाग मधील पेशंट आणि पोलिसाला ते माहीत नाही. मग त्यांना जर रेबीज झाला तर त्यास जबाबदार कोण? अशी चर्चा सुरू आहे कारण रेबीजच्या पेशंट करिता वेगळा विभाग इतर पेशंट पासून वेगळा बनवला आहे मग हे डीन साहेबाना माहीत नाही का बरं ? जर खरच कुणाला रेबीज झाला असता तर डीन साहेबानी जबाबदारी घेतली असती का ?.या सर्वावर सीपीआर रुग्णालयाच्या संबंधित विभागाने विचार करून कामात सुधारणा करण्याची गरज आहे..याची शासकीय कर्मचारी वर्गात दबक्या आवाजात कुजबुज सुरु आहे.