लोंखडी गेट अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यु प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षीकेला अटक , 25 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  - केर्ले येथे येथील स्वरुप दिपकराज माने (वय 11. रा. केर्ले पैकी मानेवाडी ) या शाळकरी मुलाचा मृत्यु झाला होता.या प्रकरणी करवीर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात शामराव माने (वय 57.रा.क.बावडा ,कोल्हापूर) आणि शिक्षीका वंदना रामचंद्र माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.आज त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यातील मयत हा केर्ले येथील कुमार विद्या मंदीर या शाळेत शिकत होता.आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्याला शाळेत सोडले होते.सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात गेले होते.

शाळेतील शिक्षीका वंदना माने यांनी स्वरुप याला गेटला बांधलेली दोरी आणि ओढ़णी सोडून बाजूला ढ़कलण्यास सांगितले.त्यावेळी स्वरुप याने गेटची दोरी आणि ओढ़णी सोडून  गेट बाजूला ढ़कलण्याचा प्रयत्न लोखंडी गेट स्वरुपाच्या डोक्यावर आदळून डोक्यावर पडल्याने त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या नाका तोंडातुन आणि कानातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे समजले.सदरचे गेट लोखंडी आणि जाड असून या लहान मुलाला सांगितल्याने त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.पोलिसांनी मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षीका वंदना माने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.याचा पुढ़ील तपास करवीर पोलिस ठाण्याचे पोसई भोसले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post