94 हजार 500/ रुपये किमंतीच्या मद्यासह एकूण 3 लाख 24 हजार 560 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.यात वाहनाचा समावेश.

राज्य उत्पादन शुल्क शाहुवाडी  विभागाची कारवाई.            

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  -विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडी कार्यालयाकडून वाहनासह 3 लाख 24 हजार 560 रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 94 हजार 560  रुपये असल्याची माहिती शाहूवाडीचे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षकांनी दिली आहे.

    कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी या पथकाने शुक्रवार (दि. 15) रोजी  गगनबावडा गावच्या हद्दीत भुईबावडा-गगनबावडा मार्गावर घाटमाथ्यावर वाहन तपासणी करताना एक ते दोनच्या  सुमारास फोर्ड कंपनीची फिगो टायटॅनियम चारचाकी वाहन तिचा रजि नं. (MH04-FR-2410 ) त्यामध्ये आठ खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य मॅकडावेल्स नं.1 व्हिस्की 180 मिलीचे एकुण 384 मद्याने भरलेल्या काचेच्या सिलबंद बाटल्या व सात खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य हनी ब्लॅन्ड बॅन्डी 180 मिलीचे एकुण 336 मद्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या सिलबंद बाटल्या. रूपये 94 हजार 560 इतकी  विदेशी मद्याची किंमत तर वाहनाची किंमत रू. 2 लाख 30 हजार असे एकूण मद्य व वाहनासह 3 लाख 24 हजार 560 इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात वाहन चालक अमित यशवंत सावंत, (वय 35, रा. गुरव गल्ली, गगनबावडा) याला( अटक करण्यात आली. या आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (A), (E) & 81,90,108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक के. बी. बिरादार, शाहूवाडीचे दुय्यम निरीक्षक व्ही. आर. शितोळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर. ठोंबरे व जवान स्टाफ एम.बी.पोवार, के.एम. पाटील, जे.आर. शिनगारे यांनी सहभाग घेतला असून या गुन्हयाचा तपास  शाहुवाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक के. बी. बिरादार  हे करीत आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post