प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हयात दहाच्या दहा जागा जिंकुन महायुतीने सत्ता प्रस्थापित केली आहे.मोठ्या चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान त्यामुळे लागलेली निकालाची उत्कंटा त्याचा लागलेला निकाल हा विरोधकांना आत्मचिंतन करण्यास लावणारा निकाल लागला आहे.यात 288 जागा पैकी महायुतीने दोनशे पेक्षा जास्त जागा पटकावून राज्यात एक हाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.विरोधकांची संख्या कमी असल्याने राज्यात विरोधी पक्षाला विरोधी पक्ष म्हणुन कुणी नसणार आहे.यात भाजपने 137 जागा मिळविल्या आहेत.अजितदादा पवार गटाने 40 जागा मिळविल्या आहेत.तर एकनाथ शिंदे गटाने 50 पेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत.त्यामुळे आगामी महानगरपालिका ,जिल्हा परिषद आणि काही संस्थाच्या निवडणुका डोळ्या समोर तुर्तास मुख्यमंत्री पद हे भाजप स्वतःकडे न घेता मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे गटाकडे रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्याच प्रमाणे पालकमंत्री मा.हसनसो मुश्रीफसो यांनी कागल मधुन सहाव्यांदा विजयी झाल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारा वेळी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.तसेच कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आ.राजेश विनायक क्षीरसागर हे तिसरयांदा विजय झाल्यामुळे त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता आहे.या सर्वाच्या विजयात महायुतीने सणा सुदीच्या काळात लाडक्या बहिणीची केलेली गोड दिवाळी यामुळे लाडक्या भावाला मताची असलेली मदत याच्यासह महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट,जेष्ठाचा मोफत प्रवास ,मुलींना मोफत शिक्षण आणि गरजुना इतर सवलती या सर्वाचा परिणाम मतावर झाला आहे.यात प्रामुख्यांने विजयी झालेले उमेदवार कागल मधुन- मा.हसनसो मुश्रीफ ,कोल्हापूर उत्तर - मा.राजेश क्षीरसागर ,कोल्हापूर दक्षीण - मा.अमल महाडिक ,शाहुवाडी - डॉ.विनय कोरे ,करवीर - मा.चंद्रदिप नरके ,चंदगड - मा.शिवाजी पाटील,इंचलकरंजी -मा.राहुल आवाडे ,राधानगरी -मा.प्रकाश आबिटकर ,शिरोळ - मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि हातकंणगले - मा.अशोक माने यांनी आपआपल्या मतदार संघात विजय मिळवला आहे..
केंद्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे आता राज्यात महायुतीने घवघवीतपणे यश मिळविल्याने आता राज्याला भरपूर निधी मिळणार .