कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगार समोर समस्या.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी असलेले कंटेनर काढ़ल्याने सफाई कामगारांनी गोळा केलेला कचरा आणि गटारातील काढ़लेली घाण ही टाकायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयी साठी कचरा टाकण्यासाठी टिपर गाड्यांची सोय केली आहे . पण सफाई कामगाराच्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
सफाई कामगार भल्या पहाटे येऊन शहरातील ठिकठिकाणचा कचरा एकत्रितपणे कंटेनर मध्ये टाकत होते.पण कंटेनर नसल्यामुळे कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिकांच्या दारासमोर ठेवला तर सकाळी-सकाळी वाद निर्माण होतो.जर कचरा रस्त्यावर दिसला तर त्या सफाई कामगारावर त्यांचे वरिष्ठ अधिकारी दंडात्मक कारवाई करुन एक दिवसाचे वेतन कट केले जाते.मुंबई-पुण्यासारख्या महानगर पालिकेने तेथील सफाई कामगाराना कचरा टाकण्यासाठी प्रत्येक भागात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्याच प्रमाणे कोल्हापुरात ही कोल्हापूर महानगरपालिकेने सोय करणे आवश्यक आहे.जर सफाई कामगाराना कचरा टाकण्याची सोय करून देणे हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे काम आहे.जर शहरातील गोळा केलेला कचरा टाकण्याची सोयच नसेल तर तो टाकायचा कुठे हे त्या संबंधित विभागाने सांगावे .अशी काही सफाई कर्मचारी वर्गातुन होत आहे.