प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - केर्ले येथे येथील स्वरुप दिपकराज माने (वय 11.रा.केर्लेपैकी मानेवाडी) या शाळकरी मुलाचा कुमार विद्या मंदीर येथील शाळेचे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडला होता.त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.ही घटना गुरुवार (दि.21) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा केर्ले येथील कुमार विद्या मंदीर या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होता.आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेत गेला होता.त्याला टॉयलेटला आल्यामुळे तेथुन जात असताना बाजूला काढ़ुन ठेवलेले लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याची माहिती मिळाली .सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आप आपल्या वर्गात शिकवित असल्याने ही घटना शाळेत कळली नाही.शेजारी असलेल्या नागरिकांना आवाज कसला म्हणुन बाहेर आल्यानंतर समजला याची माहिती शाळेत देऊन त्याच्या नातेवाईकांना दिली. काल या शाळेत मतदान केंद्र होते.या शाळेचे लोखंडी गेट पुढ़े -मागे होत नसल्यामुळे आणि मत पेट्या ने- आण करण्यासाठी काहीनी शाळेचे लोखंडी गेट बाजूला काढ़ुन ठेवल्याची माहिती काही नागरिकांनी दिली.यातुन ही दुर्घटना घडली.स्वरुप याच्या पश्च्यात आई वडील आणि एक लहान भाऊ आहे.स्वरुप याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.