खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 5.44 टक्के मतदान झाले

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे प्रतिनिधी : 

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 5.44 टक्के मतदान झालेले आहे. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.

मतदान केंद्रातील वीज पुरवठा खंडित, बंद वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे विद्यालय मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळ थांबली होती. त्यानंतर किमान १०मिनीटांनी लगेच वीजपुरवठा सुरू झाला. आणि मतदान प्रक्रिया ही सुरू झाली. . अशी माहिती वारजे येथील मतदार मनिष बराटे यांनी सांगितले. 

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे येथील चौधरी शाळेत मतदान केंद्रावर निवडणूक सुरू होण्यापूर्वीच सकाळी सकाळी मतदारांनी शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर रांगा लावल्याचे दिसून आले

.


Post a Comment

Previous Post Next Post