आमदार झाल्यावर पत्रकारांना विसरू नका!मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव व अल्ताफ पिरजादे .

 राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन पुणे शहरातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सुपूर्त..

  भावी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या विविध मागण्याचा पाठपुरावा करू असे  आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळास  दिले..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रतिनिधी :  

 पुणे : दि 15/11/24.आमदार झाल्यावर पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका पत्रकारांना विसरू नका अशी मागणी मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख  नितीन जाधव व अल्ताफ पिरजादे यांनी भेटीदरम्यान  केली. पुणे शहरातील विविध पक्षाच्या भावी लोकप्रतिनिधींना पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन दिले . 

आम्ही आपल्या सोबत आहोत मागण्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख तथा राजकीय सल्लागार नितीन जाधव  तसेच पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अल्ताफ भाई पिरजादे यांनी पुणे शहरातील   उमेदवारांच्या भेटी घेऊन सविस्तर मागण्यांचे निवेदन  सुपूर्त केले व  विधानसभेत आपण पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवावा असे सांगितले. राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे व प्रदेश सरचिटणीस विश्वासरावजी आरोटे. प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव  यांनी राज्यभर विविध लोकप्रतिनिधींना आपले  मागण्यांचे निवेदन देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरांमध्ये सदरचा उपक्रम राबवण्यात आला. यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

 सदरच्या भेटीमध्ये  भाजपचे राष्ट्रीय महासचिव  विनोदजी तावडे  यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना पत्रकारांच्या अडचणी व विविध मागण्या मंजूर करणे बाबत निवेदन दिले यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच  महायुती सरकारने  पत्रकार महामंडळ मंजूर केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. तसेच  माजी गृहराज्यमंत्री  काँग्रेसचे नेते  पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे उमेदवार रमेश बागवे यांना समक्ष भेटून सदरच्या मागण्यांचे निवेदन दिले. हडपसर मतदार संघाचे मनसे चे उमेदवार  साईनाथ बाबर यांनाही निवेदन देण्यात आले.

त्याचबरोबर  शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार  सिद्धार्थ शिरोळे यांना निवेदन दिले व चर्चा केली.

 सदरच्या मागण्यांमध्ये पत्रकारांना मंत्रालय परिसरामध्ये निवासाची सोय व्हावी. पत्रकार महामंडळ त्वरित कार्यान्वित व्हावे. युट्युब, वेब पोर्टल डिजिटल चैनल पत्रकारांना अधिकृत नोंद मिळून वार्ताहर दर्जा मिळावा. पार्किंग व टोल शुल्क माफ व्हावे. अभ्यासू पत्रकारांना तालुका व जिल्हा कमिटी वरती नियुक्ती मिळावी.यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post