करवीर तालुक्यातील यु.पी.टोळीवर हद्दपारीची कारवाई.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील "यु.पी." टोळीचा प्रमुख उमेश खंडेराव पाटील (रा.गणेश कॉलनी,सानेगुरुजी वसाहत) ,संजय दशरथ कांबळे (रा.स्मशानभूमी जवळ,कंळबा) राजेंद्र दिनकर गायकवाड (शाहू गल्ली ,कंळबा) रविंद्र सदाशिव सुतार (डी वॉर्ड ,उत्तरेश्वरपेठ) आणि मिलिंद मोहनराव घरपणकर (रा.बापूरामनगर ,कंळबा)  यांच्यावर कोल्हापुर जिल्हयातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारीना गुन्हेंगार आणि त्यांच्या टोळीची माहिती घेऊन त्यांच्यावर एमपीडीए व हद्दपारीची कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे आदेश दिले होते.त्या अनुशंगाने करवीर तालुक्यातील "यु.पी."टोळीवर कारवाई करण्यासाठी त्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता.या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन गडहिग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नेमणूक केली होती.त्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक  यांच्याकडे सादर केला असता सदर टोळीच्या वाढ़त्या गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शांतता,सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी मंगळवार (दि.12) रोजी  "यु.पी."टोळीच्या प्रमुखासह पाच जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातुन सहा महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली.त्याची अंमलबजावणी करण्याचा 

आदेश करवीर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक यांना दिला..

या काळात हद्दपार झालेले गुन्हेंगार कोल्हापूर जिल्ह्यात आढ़ळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post