प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील २१ मतदारसंघाची मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या गोदामात होईल. तर पिंपरी, भोसरी मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल होणार आहे. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी कामगार भवन येथे होणार आहे. तर शिरूर मतदारसंघातील मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी येथे होणार आहे. तर इतर मतदार संघाची मतमोजणी ही संबंधित ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे.
चोख बंदोबस्त, मंतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार उमेदवारांचे प्रतिनिधि
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित राहू शकणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर काढताना आणि मतमोजणीनंतर परत ठेवताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. फेरीनिहाय मोजणीची घोषणा होणार आहे. याची माहिती नागरिकांना देण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावले आहेत.
अशा होणार मंतमोजणीच्या फेऱ्या
जुन्नर २०
आंबेगाव १९
खेड आळंदी २०
शिरूर २०
दौंड २३
इंदापूर २५
बारामती २०
पुरंदर ३०
भोर २४
मावळ २९
चिंचवड २४
पिंपरी २०
भोसरी २२
वडगाव शेरी २२
शिवाजीनगर २०
कोथरुड २०
खडकवासला २५
पर्वती २०
हडपसर २२
पुणे कॅन्टोमेंट २०
कसबा पेठ २०
एकूण ४६५