नरहर कुलकर्णी ह्यांची गझल सुरेश भटांच्या वाटेनं जाणारी - डॉ.अविनाश सांगोलेकर यांचे गौरवोद्गार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर,दि.६ सुरेश भट यांनी अस्सल मराठमोळी गझल मराठी काव्यसृष्टीत रुजवली आणि वाढवली.त्यांच्याच वाटेनं नरहर कुलकर्णी ह्यांची गझल जाणारी असून ती मराठी गझलवैभवात निश्चितच भर टाकेल. हा गझलसंग्रह अंतरबाह्य देखणा झालेला आहे. सहज,साध्या- सोप्या शब्दातून आशयघन शेरांची बांधणी करणाऱ्या या गझल संग्रहाचे सामाजिक व सांस्कृतिक मूल्य मोठे आहे,असे गौरवोद्गार आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी काढले.ते गझलसाद समूहाच्या वतीने  सराय दालन येथे आयोजित केलेल्या नरहर कुलकर्णी ह्यांच्या 'माझ्यातल्या मला, तिला व त्यांना' ह्या गझलसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या प्रसंगी डॉ.सांगोलेकर ह्यांनी सुरेश भटांचे आणि आपले  कोल्हापूर परिसरातल्या गझलकारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध उलगडून दाखवले.त्याचबरोबर गझलसाद समूहाने कोल्हापूर परिसरात सुरेश भट यांना अभिप्रेत असलेली गझल चळवळ गतिमान ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मंचावर सुभाष नागेशकर, नरहर कुलकर्णी, माया कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रारंभी ज्येष्ठ गझलकार  प्रसाद माधव कुलकर्णी यांनी प्रास्ताविका मधून गझलसाद समूहाच्या वाटचालीची आणि या समूहाचे निमंत्रक नरहर कुलकर्णी यांच्या गझल लेखनाची वैशिष्ट्ये विशद केली. डॉ.दयानंद काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुभाष नागेशकर व माया कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. सांगोलेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नरहर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सर्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ.अविनाश सांगोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार मुशायरा झाला. त्यामध्ये नरहर कुलकर्णी यांच्यासह ज्येष्ठ गझलकार श्रीराम पचिंद्रे, डॉ. दिलीप कुलकर्णी, हेमंत डांगे ,अशोक वाडकर ,डॉ.स्नेहल कुलकर्णी,डॉ.दयानंद काळे, वैभव चौगुले,हर्षल कुमठेकर,सीमा पाटील, जमीर शेरखान, अरूण सुनगार यांनी आपल्या आशय संपन्न गझला सादर केल्या. या मुशायर्‍याचे सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर,डॉ.शरद नावरे ,डॉ.हिमांशू स्मार्त, अविनाश शिरगावकर,आर्किटेक्ट, मोहन वायचळ, महाजन . तसेच साहित्य, आर्कीटेक्चर,पेन्टिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Post a Comment

Previous Post Next Post