प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वाघबीळ येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात अंकुश आत्माराम शिंदे (वय 42.रा.रायगड कॉलनी,पाचगांव ) यांचा रविवार (दि.03) रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडल्याने डोक्यास मार लागून त्यात ते गंभीर जखमी होऊन खाली पडले होते.त्यांना जखमी अवस्थेत तेथील स्थानिक नागरिकांनी 108 या रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.
या घटनेची माहिती करवीर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला.तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून पुढ़ील तपास पोसई.भोसले करीत आहेत.
यातील मयत हे हालोंडी येथे कोमल इलेक्ट्रीक कंपनीत नोकरीस होते.ते रविवार (दि.03) रोजी सकाळी कंपनीचे पार्सल देण्यासाठी मालकाची नवीन अक्टीव्हा गाडी नं.(MH-09-GB-5922) वरुन पन्हाळा येथे जात असताना वाघबीळ जवळ गाडी स्लिप झाल्याने गाडीवरून खाली पडल्याने डोक्याला मार लागला होता.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात आई वडील,पत्नी आणि एक मुलगी आहे.