प्रेस मीडिया लाईव्ह :
विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वात अकने चर्चा रंगत आहेत.सांगायचं झालं तर, 'अनुशक्ती नगर' मतदारसंघात फहाद अहमद यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. सना मलिक यांचा विजय झाला आहे. सना मलिक या नवाब मलिक कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 128 जागांवर विजय मिळवला आहे.
एक्सवर (ट्विटर) स्वरा भास्कर हिने पोस्ट केली आहे. 'मतदान संपूर्ण दिवस असूनही ईव्हीएम मशीन 99% चार्च कसं होऊ शकतं? यावर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे… अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर भाजप समर्थित राष्ट्रवादीला मते कशी मिळू लागली?' असा प्रश्न देखील स्वरा भास्कर हिने उपस्थित केला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
स्वरा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री राजकारणावर देखील स्वतःचं स्पष्ट मत मांडत असते. ज्यामुळे स्वराला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.