महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली


प्रेस मीडिया लाईव्ह :

 राज्यातील 288 मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. राज्यात पुढील सरकार कुणाचं येणार.? याचा फैसला आज होणार आहे. मतदार राजाने आपल्या मताचे दान कोणाला दिलंय हे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघासाठी मतदान 20 नोव्हेंबरला पार पडलं. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं. तर 9 कोटींनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रावर शांतेत मतदान पार पडलं. त्यानंतर आता, राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे.

मतमोजणीच्या पहिल्या कलामध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती जागांवर आणि महाविकास आघाडीत चुरस असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून प्रत्येक फेरीनिहाय कल बदलणार आहे. त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post