शरद पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत.विआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊन देखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो. लेकीप्रमाणे नातवाला निवडून आणण्यात अपयश आल्याने, शरद पवारांच्या 'पॉवर'वर महायुती आणि 'मोदी मॅजिक' भारी पडल्याचेच म्हणावे लागेल.

पुणे जिल्ह्यातील एकूण २१ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने ज्या नऊ जागांवर निवडणूक लढविली, त्या सर्व जागा जिंकल्या असून, शरद पवार गट पाठोपाठ (१३) अजित पवार गटाने या जिल्ह्यात महायुतीत सर्वाधिक ११पवारांवर कुरघोडी करुन आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच शिंदे गटाने त्यांची एकमेव पुरंदरची लढलेली जागाही जिंकली असून, विजय शिवतारे २४ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहे एकूणच महायुतीतील पक्षांचा विजयाचा 'स्ट्राईक रेट' पुणे जिल्ह्यात 'शतप्रतिशत' राहिला असून, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाची मात्र वाताहात झाल्याचे पाहायला मिळाले. कसबा पोटनिवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या उन्मादात या पक्षाला जिल्ह्यात जागावाटपात आणि विजयातदेखील आपले स्थान राखता आले नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या चार जागांवर उमेदवार उभे होते. त्यात तीन ठिकाणी तर या पक्षात बंडखोरीदेखील बघायला मिळाली. यात कसब्यामध्ये कमल व्यवहारे, शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद आणि पर्वतीत आबा बागूल हे काँग्रेसचे बंडखोर रिंगणात होते. या सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. उबाठा गटाने लढविलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर केवळ विजय मिळविला आहे. अजित पवार गटाने लढविलेल्या ११ जागांपैकी सात जागांवर विजय मिळविला असून, शरद पवार गटाने १३ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळविला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post