महायुतीचे उमेदवार- डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयासाठी माणकापूरच्या शिवाजी येडवान यांनी चंदूर ते कबनूर पर्यंत घातला दंडवत

 



प्रेस मीडिया लाईव्ह  :    

  चंदूर- कबनूर (वार्ताहर) : 

 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार- डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या विजयासाठी माणकापूरचे आवाडे समर्थक-  कार्यकर्ते व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी "बाळुमामा भक्त-  शिवाजी येडवान" यांनी चंदूर येथील जागृत ग्रामदैवत श्री महासिध्द मंदिर येथून कबनूर- लक्ष्मीनगर येथील श्री सद्गुरू संत बाळुमामा मंदिर पर्यंत (सुमारे ४ कि. मि. अंतर) दंडवत घालून देवाला साकडे घातले. 

यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदार बंधुभगिनींनी येत्या दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रांवरील डॉ. राहुल आवाडे यांच्या नावासममोरील ४ नंबरच्या "कमळ" या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असा संकल्प करून देवाला साकडे घालून दंडवत घालत आहे असे सांगितले , यापूर्वी देखील शिवाजी येडवान या कार्यकर्त्यांने सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीचे वेळी   इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार- प्रकाश आवाडे (आण्णा) यांच्या विजयासाठी माणकापूरचे जागृत ग्रामदैवत श्री मलकारसिध्द मंदिर (गावातील) येथून इचलकरंजी राजवाडा (डी.के.टी.ई.) येथील श्री व्हनमाडसिध्द बिरदेव मंदिर पर्यंत (सुमारे ७ कि. मी. अंतर)  दंडवत घातला होता अशी उपस्थित आवाडे समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितले.                                                           

  यावेळी चंदूर येथील श्री महासिध्द मंदिर येथून दंडवत घालत असताना या ठिकाणी सभापती- महेश पाटील व आवाडे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन देत चंदूर गावातील मतदार महायुतीचे उमेदवार- राहुल आवाडे यांनाच मतदान देऊन मोठया मताधिक्याने निवडून देतील असे सांगितले.                                        

सदर माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या कन्या- कु. समायरा राहुल आवाडे यांनी कबनूर- लक्ष्मीनगर येथील श्री सद्गुरू संत बाळुमामा मंदिर येथे तात्काळ येऊन आवाडे कुटुंबियाप्रती असलेली एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची निष्ठा व प्रेम पाहून श्री सद्गुरू संत बाळुमामा चरणी नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला आणि आपली सदिच्छा व्यक्त केली.                   

याप्रसंगी जवाहर साखर कारखान्याचे इंटकचे अध्यक्ष- सर्जेराव हळदकर, सदस्य- वृषभ ऐतवडे, अमोल व्हनवाडे, प्रविण वठारे, सागर चौगुले, सुरज चौगुले, भाऊसो धनगर, रमेश आवटे, ऋषिकेश पुजारी, प्रकाश पुजारी, सिध्देश पाटील आदींसह चंदूर व कबनूर येथील आवाडे समर्थक कार्यकर्ते व बाळुमामा मंदिराच्या संयोजिका- सौ. कल्पना नामदेव यमगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post