दीप्ती चवधरी: काँग्रेस विचारधारेचा प्रभाव आजही कायम, आगामी सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य”

मोहन जोशी: “राहुल गांधींच्या ‘५ हमी योजना’सह काँग्रेस सामान्य जनतेसाठी संकल्पबद्ध”

209 - छत्रपती शिवाजीनगर विधानसभा निवडणूक 2024:

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार – दत्ता (बाप्पू) बहिरट


प्रेस मीडिया लाईव्ह :

छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय (बाप्पू) बहिरट यांच्या प्रचारासाठी आज दिप बंगला चौक येथील कार्यालयात मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी काझी, निवडणूक प्रमुख माजी आमदार दीप्तीताई चवधरी, माजी आमदार मोहनदादा जोशी, बोपोडी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, खडकी कॅन्टोनमेंट ब्लॉक अध्यक्ष भरतशेठ ठाकुर, राजेंद्र भुतडा, जावेद निलगर, महेंद्र सावंत, रमेश पवळे, विनोद रणपिसे, अन्वर शेख, रोहित बहिरट, सचिन बहिरट, बाबा सय्यद, प्रितम चव्हाण यांसारख्या मान्यवरांसह काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खडकी बाजार, बोपोडी, गोखले नगर, वडारवाडी, जनवाडी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा गांधी वसाहत आणि छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जनतेच्या समस्या, उपाययोजना आणि प्रचाराच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी दीप्तीताई चवधरी यांनी सांगितले की, काँग्रेस ही एक पारंपरिक पार्टी आहे, ज्याच्या विचारधारेचा प्रभाव आजही लोकांवर आहे. लोक काँग्रेसला मतदान करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही आपली चिंता व्यक्त केली आणि आश्वासन दिले की, काँग्रेसच्या आगामी सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

माजी आमदार मोहन जोशी यांनी आपल्या विचार मांडताना “लाडकी बहन योजना” विषयी माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या सरकारने या योजनेत अपयश अनुभवले आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी लवकरच “५ हमी योजना” सुरू करणार आहेत, जी सामान्य जनतेसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. ही योजना सामान्य नागरिकांच्या हितासाठी एक महत्त्वाची हमी म्हणून काम करेल.

या कार्यक्रमाचा अनुमोदन पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोपोडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी केले, आणि आभारप्रदर्शन मिडिया प्रमुख अन्वर शेख यांनी केले.


अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

छत्रपती शिवाजीनगर प्रचार कार्यालय

निवडणूक प्रमुख: माजी आमदार दीप्ती चवधरी

मतदारसंघ प्रभारी: अभय छाजेड 

मीडिया प्रभारी: अन्वर शेख

मोबाइल: 8459867838

Post a Comment

Previous Post Next Post