प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये भाजपच्या एका नाराजाचा समावेश आहे. तर, कॉंग्रेसचे नाराज खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत.तेरा जणांमध्ये आता निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात २४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चार अर्ज छाननीत बाद झाले होते.
निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि पक्ष
१ : दत्ता बहिरट – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२ : लतिफ शेख : बहुजन समाज पार्टी
३ : सिद्धार्थ शिरोळे – भारतीय जनता पार्टी
४ : अँथोनी ॲलेक्स – भारतीय युवा जन एकता पार्टी
५ : सुनील गोरे – स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
६ : फिरोज मुल्ला – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
७ : शुभम जडागळे- बहुजन भारत पार्टी
८ : परेश सिरसंगे – वंचित बहुजन आघाडी
९ : श्रीकांत सोनवणे – जनता दल (सेक्युलर)
१० : अजय शिंदे – अपक्ष
११ : मनीष आनंद – अपक्ष
१२ : अंजुम इनामदार – अपक्ष
१३ : विजय जगताप – अपक्ष