प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकी चालक आणि त्यांच्या सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केल्याची चर्चा असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे पोलिसांकडून तसा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. वरिष्ठ स्तरावरून हा नियम महामार्गांसाठीच जारी करण्यात आला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली असून, त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकी चालकांना तसेच त्यांच्या सहप्रवाशांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अन्यथा पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशा बातम्या येत आहेत.
त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी चर्चा केली. चर्चेदरम्यान आयुक्त म्हणाले की, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पाहता महामार्गावरील दुचाकी चालक आणि सहप्रवाशांसाठीच हा आदेश काढण्यात आला आहे. यावर बोलताना आमदार रासने म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई तीव्र करण्यात येत असून सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेकांनी मला फोन करून माहिती विचारली. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, हा आदेश केवळ महामार्गासाठी असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत आणि महामार्गावरून वाहन चालवताना प्रत्येकाने त्यांचे पालन केले पाहिजे.