रंगकर्मी-मातापित्यांचा सन्मान,विमा आणि बचत गट उपक्रम
...............
बालगंधर्व परिवार(महाराष्ट्र राज्य),अखिल भारतीय मराठी नाट्य नाटय परिषद(पुणे शाखा) , एमआरबी फाऊंडेशन कडून आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मराठी रंगभूमी दिनानिमित्त बालगंधर्व परिवार(महाराष्ट्र राज्य), अखिल भारतीय मराठी नाटय परिषद (पुणे शाखा) आणि एमआरबी फाऊंडेशन यांच्या वतीने 'चौरंगी सोहळा-२०२४' या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .पं.नेहरु सांस्कृतिक सभागृह(घोले रस्ता) येथे दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत विविध उपक्रम या सोहळ्या अंतर्गत पार पडले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे पुरस्कार प्रदान कार्यक्रम,बालगंधर्व परिवारच्या वतीने १९ कलाकार, माता -पित्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आणि कलाक्षेत्राच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला बचत गटांचे उद्घाटन -एमआरबी फॉउंडेशन च्या वतीने कलाकार कुटुंब विमा पॉलिसी संदर्भात मार्गदर्शन तसेच दि. २५ नोव्हेंबर या मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन,असे या चौरंगी सोहळ्याचे स्वरूप होते .प्रारंभी दुपारी १२ वाजता विनोद धोकटे आणि सहकलाकारांनी संगीत मेहफिल हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. शोभा कुलकर्णी, जितेंद्र वाईकर,सतीश वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले.
सायंकाळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त दीप्ती भोगले,डॉ.राम साठ्ये यांच्यासह माया धर्माधिकारी,अंजली जाखडे,विनोद धोकटे आणि सौ.स्वाती विनोद धोकटे अशा एकूण ६ नाट्यकर्मींचा गौरव या कार्य्रक्रमात करण्यात आला.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचा कै.जयंतराव टिळक स्मृती गौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना ज्येष्ठ नेते उल्हास(दादा) पवार, सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक संजय चोरडिया, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला.
कै.चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार डॉ.राम साठ्ये यांना सुनील गोडबोले,मेघराज राजेभोसले, अॅड.मंदार जोशी यांच्या हस्ते देण्यात आला.माता जानकी जीवन गौरव पुरस्कार श्रीमती माया धर्माधिकारी यांना उमा सरदेशमुख, नरेंद्र डोंगरे, मेघराज राजेभोसले यांच्याहस्ते देण्यात आला.लक्ष्मी -नारायण दांपत्य पुरस्कार विनोद धोकटे आणि सौ.स्वाती विनोद धोकटे यांना तर प्रपंचलक्ष्मी पुरस्कार अंजली जाखडे यांना देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्री स्व.मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ १० गरजू रंगकर्मींना प्रत्येकी १० हजार रुपये अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. संजय चोरडिया यांनीही पुढील वर्षीपासून १० रंगकर्मींना प्रत्येकी १० हजार देण्याची घोषणा केली. दीपाली कांबळे यांनीही दीड लाख मदतीची घोषणा केली.
जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद भंडारी(आयएएस),शाहीर हेमंत मावळे, जयमाला इनामदार, दीपक रेगे,विजय पटवर्धन,पराग चौधरी, बाळासाहेब दाभेकर,शशीकांत कोठावळे, अनील गुंजाळ, अशोक जाधव,सुरेंद्र गोखले,संदीप पाटील,अमर पुणेकर,विजय उलपे, योगेश सुपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चांगुलपणाची परंपरा पुढे चालू राहावी: उल्हास पवार
...................
उल्हास पवार म्हणाले,' यशवंतराव चव्हाण यांनी कला साहित्य क्षेत्रात्रासाठी विविध पुरस्कार सुरु केले. त्यांचे आज स्मरण होते. देहभान हरपून काम केले जाणारे हे क्षेत्र आहे.त्याचा शरीरावर परिणाम होतो. कलाकार अडचणीत येतो.अशा वेळी मदतीचा हात देण्याचा उपक्रम महत्वाचा ठरतो. महाराष्ट्राला कलाकारांची मोठी परंपरा आहे. भाषाही त्यातून जपली जाते.संगीत नाटकाचीही मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे, प्रबोधनाची परंपरा आहे.चांगल्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी उभे राहणारे दिलदार हातही समाजाला हवे आहेत. हल्ली रोज चांगले ऐकायला मिळत नाही.अशावेळी कलाक्षेत्रात तो योग येतो.ही चांगुलपणाची परंपरा पुढे चालू राहावी.'
संजय चोरडिया म्हणाले,' रंगकर्मींच्या मुलांना शिक्षणात मदत करू. दीप्ती भोगले यांच्या सारख्या रंगकर्मींनी निरंतर काम ठेवले ही मोठी गोष्ट आहे. नाटय परिषद,मेघराज राजे भोसले यांच्या उपक्रमांसोबत कायम राहू.'माधव अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना दीप्ती भोगले यांनी शिलेदार कुटुंबीयांच्या संगीत नाटक रंगभूमीवरील योगदानाला उजाळा दिला.त्या म्हणाल्या,'मागे वळून पाहताना आपण खरेच एवढे काम केले, असे वाटत नाही.संगीत नाटकावर प्रेम करून आयुष्य धन्य झाले. असेच आयुष्य पुन्हा लाभो, अशी इच्छा आहे.'
मेघराज राजेभोसले म्हणाले,' कलाक्षेत्रातील कलाकारांना, मातापित्यांना गौरविण्याचा हा सोहळा मनस्वी होता. मातापित्यांनी प्रोत्साहन दिल्यानेच या क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. फॅमिली मेडिक्लेम मुळे अडीअडचणीच्या काळात मदती चा हात मिळणार आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने प्रगती होणार आहे.
दीपक रेगे यांनी आभार मानले
.......................
फोटो ओळ : मराठी रंगभूमी दिनानिमित्त अ.भा.मराठी नाटय परिषदेतर्फे ज्येष्ठ नाटयकलाकार दीप्ती भोगले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करताना उल्हास ( दादा) पवार, संजय चोरडिया,माधव अभ्यंकर, विजय पटवर्धन, दीपक रेगे,अशोक जाधव