धर्म नव्हे तर देश धोक्यात आहे :राजस्थानचे माजी मंत्री अमीन पठाण याचे प्रतिपादन

महाराष्ट्रातील सरकार घालविण्याचे पत्रकार परिषदेत आवाहन 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :' कोई धर्म नही,बल्की देशही खतरेमे है,और उसकी वजह भाजपाकी नफरत से भरी राजनीती है ,धर्म नव्हे तर देश धोक्यात आहे कारण भाजप द्वेषाचे राजकारण करीत आहे,या द्वेषपूर्ण राजकारणाविरोधात महाराष्ट्राने कौल द्यावा',असे आवाहन आज राजस्थानचे माजी मंत्री आणि अजमेर शरीफ दर्गा समितीचे माजी अध्यक्ष अमीन पठाण यांनी केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले.यावेळी भारत जोडो अभियानाचे समन्वयक इब्राहिम खान,मराठी मुस्लिम सेवा संघचे पुणे शहराध्यक्ष जावेद शेख हे उपस्थित होते . 

अमीन पठाण म्हणाले,'भाजपच्या बऱ्याच योजना दहा वर्षात फसल्या आहेत.म्हणून 'मंगळसूत्र तोडले जाईल','जमिनी ताब्यात घेतल्या जातील','कटेंगे तो बटेंगे' वर उतरले आहेत.हा देश अनेकतेतून एकतेचे सौंदर्य मानणारा आहे.मात्र,सत्तेसाठी देशाला द्वेषाच्या खाईत लोटून देणे हाच अजेंडा आहे.संविधान बदलणे हाही अजेंडा आहे.त्या विरोधात देशाने लोकसभेत भाजपला योग्य संदेश दिला आहे.कोणताही धर्म धोक्यात नाही,तर देश धोक्यात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास भाजपचे केंद्रातील सरकार लवकरच पडेल.


'येणाऱ्या पिढयांना आपण काय देणार आहोत याचा विचार केला पाहिजे आणि महाविकास आघाडीला निवडून दिले पाहिजे',असे आवाहन अमीन पठाण यांनी केले.'देशाला घाबरविण्याचे आणि दरी निर्माण करण्यासाठी स्फोटक वक्तव्ये सुरु आहेत.फक्त राहुल गांधी आणि सहयोगी पक्ष हे संविधान,प्रेम,रोजगार याबाबत बोलत आहेत.महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यस्था परिस्थिती बिघडली आहे.या सरकारने गुंडाना मोकळीक दिली आहे.त्यामुळे त्यांना सत्तेवर ठेवणे धोकादायक आहे',असेही त्यांनी सांगितले.                                                                   

Post a Comment

Previous Post Next Post