प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : संभळच्या शाही जामा मशिदीचे असंवैधानिक सर्वेक्षण आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांच्या हत्येच्या विरोधात जमियत उलेमा पुणेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवस यांना निवेदन देण्यात आले.
दोषींवर कठोर कारवाई करून शहीद झालेल्या बालकांना न्याय व नुकसान भरपाई देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी कारी इद्रिस नायब सदर जमीयत उलेमा महाराष्ट्र, मौलाना समद, मौलाना शाकीर, आसिफ खोकर, युसूफ जकाती, मोईन भाई, शफकत अहमद, मुबशीर शाह, अब्दुलहमेद इनामदार, कारी शमशेर, मुबारक भाई, उस्मान कादरी, हाफिज नकीब, मौलाना इसाक, म. डॉ.शोएब अन्सारी आदी उपस्थित होते!