प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत. यातील 8 मतदारसंघ हे शहरात आहेत, तर 13 मतदारसंघ हे ग्रामीण भागात आहेत. आज आपण पुण्यात कोणते असे मतदारसंघ आहेत ज्यात चुरशीची लढत होत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1. कसबा - 215
कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पहायला मिळत आहे. कसब्यात महाविकास आघाडीने कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे भाजपने हेमंत रासने यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच मनसेने गणेश भोकरे यांनी मैदानात उतरवून कसब्यातील लढत तिरंगी बनवली आहे. आता रवींद्र धंगेकर सलग दुसऱ्यांना विधानभवन गाठणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2. कोथरूड - 210
कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रकांत मोकाटे यांना मैदानात उतरवले आहे. तसेच मनसेने या मतदारसंघातून किशोर शिंदे यांना संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळत आहे.
3. हडपसर - 213
हडपसरमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ) थेट लढत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रशांत जगताप यांच्यावपर विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर मनसेने साईनाथ बाबर यांना मैदानात उतरवून ही लढत आणखी चुरशीची बनवली आहे.
4. बारामती - 201
संपूर्ण राज्याचे लक्ष हे बारामतीकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे या मतदारसंघातून मैदानात आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. त्याचबरोबर अभिजीत बिचुकले हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून मैदानात उतरलेले आहेत.
5. इंदापूर - 200
बारामतीप्रमाणे इंदापूरकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. इंदापूरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या हर्षवर्धन पाटलांना ( उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आनदार दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा संधी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवीण माने यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
6. आंबेगाव -
आंबेगावमध्येही शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांचा विजयरथ रोखणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
7. दौंड - 199
दौंडमधून महायुतीने राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रमेशआप्पा थोरात यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दौंडची जनता या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकणार आणि मुंबईला पाठवणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
8. पर्वती - 212
पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ आणि शरद पवार यांच्या आश्विनी कदम ) यांच्यात सामना रंगला आहे. मात्र काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी बंडखोरी करत या मतदारसंघातील चुरस आणखी वाढवली आहे. या बंडखोरीचा फटका आश्विनी कदम यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
9. पुरंदर - 202
पुरंदरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट लढत पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर शिवसेनेने माजी आमदार विजय शिवतारे यांना संधी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजीराव झेंडे यांनी बंडखोरी केली आहे.
अ.क्र | मतदारसंघाचे नाव | महाविकास आघाडीचा उमेदवार | महायुचीचा उमेदवा | इतर पक्षाचा उमेदवार |
1. | कसबा | रवींद्र धंगेकर, काँग्रेस | हेमंत रासने, भाजप | गणेश भोकरे, मनसे |
2. | शिवाजीनगर | दत्ता बहिरट, काँग्रेस | सिद्धार्थ शिरोळे, भाजप | मनीषा आनंद, काँग्रेस बंडखोर |
3. | कोथरूड | चंद्रकांत मोकाटे, शिवसेना (उबाठा) | चंद्रकांत पाटील, भाजप | किशोर शिंदे, मनसे |
4. | खडकवासला | सचिन दोडके, NCP शरद पवार | भीमराव तापकीर, भाजप | मयुरेश वांजळे, मनसे |
5. | हडपसर | प्रशांत जगताप, NCP शरद पवार | चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | साईनाथ बाबर, मनसे |
6. | वडगावशेरी | बापूसाहेब पठारे, NCP शरद पवार | सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | - |
7. | पर्वती | अश्विनी कदम, NCP शरद पवार | माधुरी मिसाळ, भाजप | आबा बागुल, काँग्रेस बंडखोर |
8. | कॅन्टोन्मेंट | रमेश बागवे, काँग्रेस | सुनील कांबळे, भाजप | - |
9. | इंदापूर | हर्षवर्धन पाटील, NCP शरद पवार | दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | प्रवीण माने, बंडखोर NCP शरद पवार |
10. | बारामती | युगेंद्र पवार, NCP शरद पवार | अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | अभिजीत बिचुकले, अपक्ष |
11. | पुरंदर | संजय जगताप, काँग्रेस | विजय शिवतारे, शिवसेना | संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
12. | भोर-वेल्हा मुळशी | संग्राम थोपटे, काँग्रेस | शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | किरण दगडे पाटील, बंडखोर भाजप |
13. | मावळ | - | सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | बापूसाहेब भेगडे, अपक्ष |
14. | खेड आळंदी | बाबाजी काळे, शिवसेना उबाठा | दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | - |
15. | आंबेगाव | देवदत्त निकम, NCP शरद पवार | दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | - |
16. | जुन्नर | सत्यशील शेरकर, NCP शरद पवार | अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | आशा बुचके, भाजप बंडखोर |
17. | शिरूर हवेली | अशोक पवार, NCP शरद पवार | माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | - |
18. | दौंड | रमेशआप्पा थोरात, NCP शरद पवार | राहुल कुल, भाजप | - |
19. | पिंपरी | सुलक्षणा शीलवंत, NCP शरद पवार | अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | मनोज गरबडे, वंचित |
20. | चिंचवड | राहुल कलाटे, NCP शरद पवार | शंकर जगताप, भाजप | - |
21. | भोसरी | अजित गव्हाणे, NCP शरद पवार | महेश लांडगे, भाजप | - |