प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बंडखोरी पडली महागात , पाच नेत्यांचे तब्बल सहा वर्षांसाठी निलंबन, यात पुण्यातील नेत्याचाही समावेश आहे तीन पक्ष मिळून एकत्रितपणे निवडणुकीला समोरे जात असल्यामुळे मतदारसंघ हे युतीमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये नाराजीनाट्य सुरु असून बंडखोरी वाढली आहे. काही मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना देखील मित्रपक्षातील उमेदवार दिले आहेत. तर काही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. अनेक मतदारसंघामध्ये नेत्यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख (दि.04) होऊन गेली . तरी देखील अर्ज मागे न घेतल्यामुळे कॉग्रेस पक्षाने बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे.कॉंग्रेस पक्षाने पाच बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बंड करणाऱ्या पाच नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई थोड्या नाही तर तब्बल सहा वर्षांसाठी करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यामध्ये, राजेंद्र मुळीक, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, याज्ञवल्क्य जिचकरजिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे. आबा बागुल हे पुण्यातील कॉंग्रेस नेते असून त्यांच्यावर निलंबानाची कारवाई करण्यात आली आहे.
Tags
पुणे विधानसभा