जातीयवादी शक्तींना कोणत्याही स्थितीत सत्तेत बसू देणार नाही

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार केला आहे.विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील एकही जागा महायुतीने आरपीआयच्या उमेदवाराला दिली नाही. याच्या निषेधार्थ आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा घेतली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पदाधिकाऱ्यांना ही शपथ दिली.

शहरातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात आहे. त्याचे पडसाद निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळतील, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले. आय्युब शेख म्हणाले, निवडणूक जवळ आली की मतदानासाठी आरपीआय पक्षाचा, दलित आणि मुस्लिमांचा वापर केला जातो. मतदान झाल्यानंतर मात्र या सर्वसामान्य घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जातीयवादी शक्तींना कोणत्याही स्थितीत सत्तेत बसू देणार नसल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post