पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून २० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात तर ६ जणांची माघार ..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. शेवटच्या दिवशी ६ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. या मतदारसंघातून एकूण २७ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले होते.त्यातील एका उमेदवाराचे दोन अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले होते. त्यानंतर उर्वरितमधील ६ जणांनी माघार घेतल्याने २० जण रिंगणात आहेत.

या मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक भीम सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे व सहाय्यक निवडणुक अधिकारी सुनंदा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज माघारी घेण्याची तसेच चिन्हवाटप प्रक्रिया पार पडली. तर या मतदारसंघात प्रामुख्याने २०१९ प्रमाणेच महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्यात थेट लढत होणार आहे.

या उमेदवारांची माघार –

गोरख घोडके, पांडुरंग गायकवाड, लताबाई राजगुरू, भारत वैरागे, गोवर्धन खुडे, अशोक जगताप.

 अधिकृत उमेदवार –

आमदार सुनील कांबळे, माजी आमदार रमेश बागवे, यशवंत नडगम, रमेश पोखर्णीकर, भीमराव कांबळे, नीलेश आल्हाट, अमोल तुजारे, महेंद्र जगताप, छाया जाधव, सुनील भोसले, युवराज बनसोडे, गणेश शेंडगे, शतायू भगळे, सोमनाथ पोळ, लक्ष्मण जावळे, विक्रम जगताप, गंगाराम गायकवाड, राकेश वाल्मिकी, दिलीप रावसाहेब कांबळे, दत्ता जाधव

Post a Comment

Previous Post Next Post