प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेल्या वचपा विधानसभा निवडणुकीत काढला आहे. याठिकाणी भाजपचे हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला आहे. याठिकाणी कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे.सुरूवातीला दोन्ही उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली होती. हेमंत रासने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील पार पडली होती. त्यात देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीच्या सर्वच नेत्यांनी रासने यांचा मोठा प्रचार केला होता. त्यात आता हेमंत रासने हे कसब्यातून पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे कसब्यात आता मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
दरम्यान, सातव्या फेरी अखेर हेमंत रासने यांनी 12740 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर त्यांची आघाडी वाढतच जात होती.