महाराष्ट्राचा विकास महाविकास आघाडी सरकारच करू शकते : अँड अय्युब शेख

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्राचा विकास महाविकास आघाडी सरकारच करू शकते  त्या साठी सर्वांनी महाआघाडी च्या उमेदवारांना जास्ती जास्त मतांनी निवडून देण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे , महाराष्ट्राला विनाशा पासून वाचवण्याची हीच वेळ आहे  तेव्हा सर्वांनी एक जुट होऊन काम करण्याची गरज आहे  असे प्रतिपादन अँड अय्युब शेख यांनी महाविकास आघाडी च्या समर्थनात  आयोजित केलेल्या अल्संख्याक मेळाव्यात केले. 



या आयोजित अल्संख्याक मेळाव्यास महाविकास आघाडी चे हडपसर विधानसभेचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी  मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय बाबत चा उल्लेख करत या विधानसभेत महायुतीला सत्तेपासुन  बाजूला करण्याची वेळ आली आहे , काँग्रेस चे मोहन जोशी यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली , कसबा काँग्रेस चे उमेदवार रविंद्र  धंगेकर यांनी महाराष्ट्राचा विकास फक्त महाविकास आघाडी च करू शकते या साठी सर्वांनी  आता  महाविकास आघाडी च्या उमेदवारांना जास्ती जास्त मते देऊन विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अविनाश बागवे यांनी  मतदानाच्या दिवशी सकाळी लवकरच सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले. सदरचा अल्पसंख्यांक मेळावा गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्ट येथे घेण्यात आला 

या मेळाव्याचे आयोजन माजी नगरसेवक अँड अय्युब शेख  यांनी केले , या   मेळाव्यास मुस्लिम समाज  मोठ्या संख्येने उपस्थित होते , हा मिळावा यशस्वी होण्यासाठी मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , मशकूर शेख , हाजी सईद सय्यद , सादिक लुकडे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. मेळावा संपन्न झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

Post a Comment

Previous Post Next Post